Saturday, May 30

Tag: Four-year delay ends

Railway Get Road work : चार वर्षांची रखडपट्टी संपली; रेल्वे गेट परिसरातील रस्त्याच्या कामाला वेग, उड्डाणपुलाची जोरदार मागणी

Railway Get Road work : चार वर्षांची रखडपट्टी संपली; रेल्वे गेट परिसरातील रस्त्याच्या कामाला वेग, उड्डाणपुलाची जोरदार मागणी

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार | शहरातून जाणाऱ्या भोकर–हिमायतनगर–किनवट राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट परिसरातील सिमेंट रस्त्याचे तब्बल चार वर्षांपासून रखडलेले काम अखेर पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. अर्धवट अवस्थेतील रस्ता, खोल खड्डे व साचलेली खडी यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक अपघात घडले होते. वाहनचालक, पादचारी तसेच शासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. रेल्वे गेटपासून तहसील कार्यालय, पंचायत समिती व न्यायालयाकडे जाणारा हा प्रमुख मार्ग असल्याने दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असते. पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य तर उन्हाळ्यात धुळीचे लोट उडत असल्याने व्यापारी व रहिवासी त्रस्त झाले होते. वारंवार निवेदने, आंदोलने व मागण्या करूनही कामाला गती मिळत नव्हती. अखेर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने कामाला सुर...
error: Content is protected !!