Monday, May 25

Tag: Four Shops Gutted

Massive Fire In Islapur : इस्लापूर शहरात मध्यरात्री भीषण आग; चार दुकाने जळून खाक

Massive Fire In Islapur : इस्लापूर शहरात मध्यरात्री भीषण आग; चार दुकाने जळून खाक

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड/किनवट/इस्लापूर | इस्लापूर शहरातील मुख्य चौक परिसरात १४ मार्च रोजी उशिरा रात्री लागलेल्या भीषण आगीत चार दुकाने जळून खाक झाली. या आगीत सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य चौकातील दीपक बूट हाऊस या दुकानाला रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत शेजारील साईबाबा हार्डवेअर, साईबाबा उपहारगृह आणि ओम साई मोबाईल रिपेअरिंग या दुकानांनाही वेढले. आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले व आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीदरम्यान स्फोट होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी धाडस दाखवत उपहार गृहातील चार गॅस सिलेंडर सुरक्षित बाहेर काढले, त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या आगीत रामराव...
error: Content is protected !!