Nanded ; नांदेडचे माजी महापौर व उपमहापौर भाजपात ! ना.चंद्रशेखर बावनकुळे, खा.अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
नांदेड l भारतीय जनता पक्षाने आगामी महानगरपालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली असून या पक्षाकडे तिकीट मागण्याचा मोठा लोंढा सुरू असतानाच या पक्षाने काँग्रेस व मनसेला खिंडार पाडले आहे.नांदेडच्या माजी महापौर जयश्री नीलेश पावडे व माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांच्यासह मनसेच्या विनोद पावडे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या समन्वय समितीची बैठक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व खा.अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत उभय नेत्यांनी भाजपा विजयाचा प्रमुख पदाधिकार्यांना कानमंत्र दिला. कुठलीही निवडणूक सोपी न समजता सूक्ष्म नियोजन करून विजयाच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. भारतीय जनता पक्षाची ताकद ही शहरातील सामान्य...
