Registration is mandatory for private animal servants : खासगी पशुसेवकांना नोंदणी करणे बंधनकारक
नांदेड| जिल्हात प्रजनन क्षम पशुंसाठी कृत्रिम रेतनाची सुविधा व अन्य सुविधा पुरविणाऱ्या सर्व खाजगी पशुसेवकांनी आपल्या नावाची नोंदणी करावी,असे आदेश सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांनी जारी केले आहे.त्यामुळे सर्व खाजगी पशुसेवकांनी आपल्या नावाची नोंदणी करावी,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात प्रजनन क्षम पशूंसाठी कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम रेतन करणारे खाजगी पशु सेवक मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील सर्व खासगी कृत्रिम रेतन सेवा पुरविणाऱ्या तंत्रज्ञ, गोठीत रेत मात्रा वितरक व रेत बँकांनी पशुसंवर्धन उपायुक्त किंवा गोजातीय प्राधिकरण यांच्याकडे नाव नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे आदेश काढण्यात आले आहे.
कृत्रिम रेतन तंत्रज्ञ म्हणून नोंदणी करण्यासाठी भारतीय पशुवैद्यक परिषदेने मान्यता दिलेल्या विद्यापीठातून पशुवैद्यक शास्त्रामधील पदवी, भारत सरकारच्या मैत्री भारत...
