Sanjay Neelpatrewar : संजय नीलपत्रेवार यांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते सन्मान
उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर तालुका कंधार येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार यांनी गुन्हे निर्गती मध्ये उत्कृष्ट कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल श्री मा. अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या हस्ते संजय नीलपत्रेवार यांचा यशोचित सत्कार, सन्मान करून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
उस्माननगर पोलीस ठाण्याचे साहायक पोलीस निरीक्षक नीलपत्रेवार यांनी मागील अनेक वर्षांपासून प्रामाणिक पोलीस दलात सेवा बजावली असून अनेक जटिल गुन्हे त्यांनी हाताळले आहेत. सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात त्यांचा हातखंडा असून त्यांनी जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात यशस्वी कर्तव्य बजावले आहे. पोलीस स्टेशन उस्माननगर येथे माहे जून २०२५ महिन्यात सर्व गुन्हे एकूण ५८ निर्गती करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी अविरत दिलेल्या सेवेचा सन्मान करण्यासाठी नांदेड पोलीस दलाच्या वतीने त्यां...
