Sunday, June 28

Tag: for free treatment

Ayushman card : मोफत उपचारासाठी आयुष्यमान कार्ड तयार करुन घ्या – जिल्हाधिकारी

Ayushman card : मोफत उपचारासाठी आयुष्यमान कार्ड तयार करुन घ्या – जिल्हाधिकारी

आरोग्य, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यात सध्या आयुष्यमान कार्ड निर्मिती मोहिम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत नुकतेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणी केली. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः आयुष्यमान कार्ड तयार करून नागरिकांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला. यावेळी त्यांनी गरजू व आजारी लाभार्थ्यांना मोफत उपचाराचा लाभ मिळावा, अशी भावना व्यक्त केली. यावेळी प्रशिक्षणार्थी अधिकारी अनन्या रेड्डी उपस्थित होत्या. जिल्ह्यात एकूण 27 लाख 38 हजार लाभार्थी असून, त्यापैकी 10 लाख 38 हजार नागरिकांना कार्ड वितरित झाले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनी देखील तात्काळ आपले कार्ड करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नुकतेच वजीराबाद भागातील कस्तुराबाई शर्मा या 104 वर्षीय आजीबाईंचे ‘आयुष्यमान वय वंदना’ कार्ड तयार करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आयुष्यमान क...
error: Content is protected !!