Collecter Abhijit Raut : नांदेड जिल्हा निर्यातक्षम केळी उत्पादक शेतकऱ्यांचा हब बनविणार- अभिजीत राऊत -NNL
नांदेड| अलिकडच्या काळात शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पद्धती सोडून निर्यातक्षम केळी उत्पादकतेवर भर द्यावा. तसेच शेतीसह शेतमाल प्रक्रिया उद्योगाकडे वळावे. उत्पादित केलेला पक्का शेतमाल निर्यात करण्याकडे भर द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच सहकार व पणन विभाग अंतर्गत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी व आत्मा विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने केळी उत्तम कृषी पद्धती या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास मॅग्नेट प्रकल्प पुण्याचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, प्रकल्प संचालक आत्मा शिरफुले, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ प...
