Friday, May 15

Tag: flowers and trees are in a state of disrepair

The municipal administration ; वसंतराव नाईक उद्यानाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष, लॉन, फुल झाडं अस्तित्व हिनतेकडे तर फरशीचे तुकडे व कचरा सर्वत्र

The municipal administration ; वसंतराव नाईक उद्यानाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष, लॉन, फुल झाडं अस्तित्व हिनतेकडे तर फरशीचे तुकडे व कचरा सर्वत्र

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l नांदेड मनपा अंतर्गत असलेल्या शोभानगर रोडवरील वसंतराव नाईक उद्यानाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे उद्यानातील लॉन व फुल झाडे आपलं अस्तित्व गमावण्याकडे वाटचाल सुरू झाली असून सर्वत्र फरशीच्या तुकड्यांचे ढिगारे व कचराच कचरा पसरलेला दिसून येतो .तर उद्यानाच्या गेट पुढे खोदून ठेवल्यामुळे जेष्ठ नागरिकांचा दगडावरून पाय घसरून पडण्याची व फ्रॅक्चर होण्याची शक्यता नाकारता येत नाही .गेट पुढे का ? कशासाठी ? व कोणी खोदले ? हे प्रशासनालाच माहिती असेल. आनंद नगर ते शोभा नगर रोडवर नाईक नगर मध्ये "वसंतराव नाईक उद्यान " आहे. ५ ,६महिन्यापूर्वीच लाखो रुपये खर्चून लॉन व फुल झाडांची लागवड केलेली होती . तर महिन्यापूर्वीच वाकिंग ट्रॅक वरील फरशी काढून पेवर बसवण्यावर लाखोंनी खर्च केलेला आहे. हा सगळा पैसा जनतेकडून कर स्वरूपात गोळा करून खर्च केला जात असतो. तो पैसा वाया घालवणे संयुक्तीक ठरणार नाही ....
error: Content is protected !!