Flag hoisting : पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनाला झेंडावंदन
नांदेड| राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण,दुग्धविकास,अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्याहस्ते उद्या रविवारी सकाळी ९.१५ वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन (Flag hoisting) होणार आहे. पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय वजीराबाद नांदेड येथे मुख्य समारोह होणार असून सर्व निमंत्रितांनी अर्धा तास आधी स्थानापन्न होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नांदेड येथील पालकमंत्री पदाची जबाबदारी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जामंत्री अतुल सावे यांच्याकडे देण्यात आली आहे. उद्या त्यांच्या शुभहस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी ते जिल्ह्याला संबोधितही करतील. यावेळी होणाऱ्या पथसंचलनामध्ये जिल्ह्यातील विकास कामांवर आधारित अनेक चित्ररथ, झाँकी,पोलीस दलाचे पथसंचलन, शाळांचे पथसंचलन, विविध उपलब्धीचे सादरीकरण पोलीस कवायत मैदान पोली...
