Army XI and A. G. Final fight in Nagpur : आर्मी इलेवन आणी ए. जी. नागपुर मध्ये अंतिम लढत -NNL
नांदेड। एकवनव्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड आणी सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट अंतर्गत खेळण्यात असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यश मिळवत आर्मी इलेवन जालंधर संघ आणी ए. जी. नागपुर संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर बीएसएफ जालंधर आणी साईं एक्सेलेंसी संभाजीनगर संघाना तिसऱ्या स्थानासाठी संघर्ष करावा लागणार आहे. उद्या सोमवारी सकाळी 10 वाजता सुमारास खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम मैदानावर अंतिम सामना खेळण्यात येईल अशी माहिती स्पर्धा आयोजन समिती प्रमुख स. गुरमीतसिंघ नवाब यांनी येथे दिली.
आज दुपारी एक वाजता उपांत्य फेरीचा पहिला सामना आर्मी इलेवन जालंधर आणी बीएसएफ जालंधर संघात खेळला गेला. या सामन्यात आर्मी इलेवन संघाने 3 विरुद्ध 1 गोल अंतराने बीएसएफ जालंधर संघावर विजय मिळवला. आर्मी इलेवन संघातर्फे आलीशान मोहम्मद याने 11 व्या मिनिटाला, समीर मिंज याने 13 व्या मिनिटाला गोल करुन सामन्...
