रेल्वेस्थानक रोड, उमरचौक भागात स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसवून संभाव्य अपघात थांबवा – फेरोजखान पठाण – NNL
हिमायतनगर| राष्ट्रीय महामार्गावरील उमरचौक, श्री परमेश्वर मंदिर कमान, रेल्वे स्थनाकाकडे जाणाऱ्या मुख्य चौरस्त्यावर दिवसेंदिवस किरकोळ अपघाताची मालिका सुरूच आहे. अशीच स्थिती राहिली तर भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. म्हणून संभाव्य धोका टाळण्या करिता शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसविण्यात यावे. अशी मागणी काँग्रेस अल्प संख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक फेरोजखान पठाण यांनी केली आहे.
भोकर ते वणी अंतर्गत रस्त्याचा समावेश नॅशनल हायवे मध्ये करण्यात येवून रस्ता विस्तारीकरणाचे काम हिमायतनगर शहरातून करण्यात आले आहे. भोकर कडून हिमायतनगर नवीन दारलूम पर्यत काम वेगाने पुर्ण करण्यात आले. मात्र दारूलूम पासून इस्लापूर मार्गे किनवटकडे जाण्याऱ्या अंतर्गत रस्त्याचे काम अतिशय कासव गतीने तेही अर्धवट करण्यात आले आहे. शासनाच्या अंदाज ...
