Nanded ; महीला पोलिस अधिकारी सौ.लोपामुद्रा आनेराव – कुबडे यांचे नांदेड स्थानकावर जंगी स्वागत
उस्माननगर l आफ्रिका खंडातील टांझानिया देशातील सर्वोच्च शिखर किलोमांजरो येथे १५ ऑगस्ट रोजी शिखरावर जाऊन भारतीय तिरंगा झेंडा फडकावून मायदेशी भारतात नांदेड येथील हुजूर साहीब रेल्वे स्थानकावर दि.१९ ऑगस्ट रोजीआगमन झाल्यानंतर परिवाराने जंगी स्वागत केले.
उस्माननगर पोलिस स्टेशनच्या सपोउनि म्हणून कार्यरत असलेल्या सौ.लोपामुद्रा सुशील कुबडे -आनेराव या दि ९ ऑगस्ट रोजी दक्षिण आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेल्या टांझानिया देशातील किलोमांजारो या शिखरावर जाण्यासासाठी नांदेड येथुन रवाना झाल्या त्यानंतर शिखरावर जाण्यासाठी दि. ११ ऑगस्टला सुरूवात केली तर दि.१५ ऑगस्ट ला सकाळी शिखरावर जावून ९: ३० मिनिटानी शिखरावर भारतीय तिरंगा झेंडा फडकविला.
सौ.लोपामुद्राआनेराव - कुबडे या धाडसी व कर्तृत्ववान महीला पोलिस अधिकारी म्हणून पोलिस खात्यात ओळख आहे. त्यांनी घेतलेला निर्णय हा अंतिम निर्णय समजून दक्षिण आफ्रिका खंडात...
