अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात
नांदेड l शंभरावरून अधिक निराधार मुलांचे संगोपन करताना पायाभूत सुविधांचा अभाव होता, पावलापावलावर अपमान सहन करावा लागला, काट्याकुट्यांचा प्रवास करावा लागला , प्रसंगी भिक्षा मागून अनाथ मुलांचे संगोपन करावे लागले पण आम्ही चालत राहिलो. कारण अडचणी अनेक असल्या तरी सत्कार्यासाठी चांगले लोक धावून पण येतात. असे प्रतिपादन गेवराई येथील सहारा अनाथालयाच्या संचालिका निराधार लेकरांची आई प्रीती संतोष गर्जे यांनी केले. गोरठा तालुका उमरी येथील वरदानंद प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या काशीबाई फुलारी स्मृती नारायण पुरस्काराने सन्मानित झाल्यावर सत्काराला उत्तर देताना प्रीती गर्जे बोलत होत्या.
प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या सहाव्या मराठी साहित्य संमेलनात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संमेलनाध्यक्ष प्रा डॉ पी विठ्ठल, पाचव्या संमेलनाचे अध्यक्ष प्रभाकर साळेगावकर, सभापती शिरीष देशमुख गोरठेकर ,...
