शैक्षणिक वर्षारंभ प्रसंगी सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करावा -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे। सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात शनिवारी (दि.१५ जून) व विदर्भातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दिनांक ०१/०७/२०२४ रोजी प्रारंभ होणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरु होण्याच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी तसेच उत्सुकतेने होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सत्र २०२४-२५ मध्ये इयत्ता १ ली ते १२ वी मधील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवाच्या प्रसंगी स्वागत करावे, असे राज्याचे शिक्षण संचालक (प्राथमिक) नंदकुमार बेडसे यांनी पत्राद्वारे कळविले असल्याचे गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांनी सांगितले.
त्याअनुषंगाने पुढील प्रमाणे मुख्याध्यापकांनी कार्यवाही करावी : शाळेच्या परिसरातील (वयोगट ६ ते १४ वर्ष) वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश झाले असल्याची खात्री करण्यात ...
