CIDCO Hadkot bandh : सकल हिंदू समाजाचा बंदला सिडको हडकोत ऊत्सफुर्त प्रतिसाद -NNL
नवीन नांदेड| बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधात १७ ऑगस्ट २४ शनिवार रोजी संपूर्ण नांदेड शहर व सिडको हडको नवीन नांदेड सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असुन यामध्ये विविध व्यापारी प्रतिष्ठाणे, हॉटेल, पानटपरी, हातगडे , भाजी विक्रेते यांनी सहभाग नोदंवत बंदला १०० टक्के पांठीबा दर्शविला यावेळी माता रमाबाई आंबेडकर चौक येथे बंगाला देशात हिंदुवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेध व्यक्त करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपूर्वी बंगाली देशात हिंदू वर होत असलेल्या अत्याचार निषेधार्थ सिडको हडको नवीन नांदेड भागात सकल हिंदू समाज बांधवांचा वतीने १७ आगस्ट रोजी बंदचे आवाहन करण्यात आले होते,यावेळी प्रारंभी हडको मध्ये छत्रपती शिवाजी महाराज,सिडको अण्णा भाऊ साठे,छत्रप्रती शिवाजी महाराज,महाराणा प्रतापसिंह पुतळा व माता रमाई आंबेडकर चौक येथे पुष्पह...
