Illigal wine & Gambaling ; गणपती विसर्जन पूर्व संध्येला अवैद्य दारू जुगार खेळणाऱ्या 44 जणांवर कार्यकारी -NNL
नांदेड। गणपती विसर्जनाच्या पुर्वसंध्येला (Operation flush out) अंतर्गत विशेष मोहीम राबवुन अवैध दारू आणि जुगारावर कारवाई एकु 20 गुन्हे, 44 आरोपीवर कार्यवाही करून 7,47,209/- रू चा मुद्देमाल केला जप्त करण्यात आला आहे.
अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी, (Operation flush out) अंतर्गत गणपती विसर्जनाच्या पुर्वसंध्येला जास्तीत जास्त अवैध धंद्यावर कारवाया करणेकरीता सर्व पोस्टे प्रभारी अधीकारी यांना आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने (Operation flush out) अंतर्गत संबधीत पोस्टे प्रभारी यांनी अवैध धंद्यावर छापे मारून कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यात महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे एकुण सहा ठिकाणी छापे मारून 4,53,740/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन 22 ईसमांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात पोस्टे शिवाजीनगर-2, भाग्यनगर-1, उमरी-1, मरखेल-1, उस्मानगर-1 याप्रमाणे 06 गुन्हे दाखल करण्यात आले आ...
