District Collector : भाषेसह ऐतिहासिक स्थळांची समृद्धी जपण्यावर भर द्यावा -जिल्हाधिकारी
नांदेड| भाषाविषयक नांदेड जिल्हा हा मराठवाड्यात सर्वात समृद्धी जिल्हा असून येथे तेलगू, कन्नड, हिंदी, उर्दू, पंजाबी, इंग्रजी, बोली भाषा अशा विविध भाषा बोलल्या जातात. या विविध भाषेने समृद्ध असलेला नांदेड हा भारतातला एकमेव जिल्हा असून आपण सर्वांनी जिल्ह्यातील भाषेसह ऐतिहासिक स्थळांची समृद्धी जपण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
आज नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन या विषयावर नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय आणि वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय, देगलूर तसेच वारसा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्र नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे बोलत होते. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे प्राचार्य एम.वाय.कुलकर्णी, वै. ध...

