Friday, May 15

Tag: during NEET (UG) entrance examination

NEET (UG) entrance examination : नीट (UG) प्रवेश परीक्षा काळात प्रतिबंधीत वस्तुंच्या वापरावर प्रशासनाचे कडक लक्ष

NEET (UG) entrance examination : नीट (UG) प्रवेश परीक्षा काळात प्रतिबंधीत वस्तुंच्या वापरावर प्रशासनाचे कडक लक्ष

करियर, नांदेड
नांदेड| राष्ट्रीय परीक्षा एजेंसी नवी दिल्ली मार्फत आयोजीत नीट NEET (UG) प्रवेश परीक्षा नांदेड जिल्ह्यात आयोजीत करण्यात आली आहे. या परिक्षेसाठी जिल्ह्यात एकुण 56 केंद्र नियोजीत असून त्यापैकी नांदेड शहरात 46 केंद्र, मुदखेड तालुक्यात 4 केंद्र, नायगाव तालुक्यात 4 केंद्र व बिलोली तालुक्यात 2 केंद्रावर ही परीक्षा रविवार 4 मे 2025 रोजी नियोजीत आहे. नीट (UG) प्रवेश परीक्षाकरीता पात्र उमेदवारांनी रविवार 4 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यत पोहचण्याचे प्रयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले नांदेड यांनी केले आहे. परिक्षार्थी मार्फत कुठल्याही गैर मार्गांचा अवलंब परीक्षा काळात होऊ नये. जसे ईलेक्ट्रोनीक उपकरणांचा, ब्लुटूथचा वापर आळा बसणे अनुषंगाने परिक्षार्थी यांची परीक्षा केंद्रावर वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत कान, नाक, घसा संबंधाने तज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे. उमेदवारांना कोणत्या...
error: Content is protected !!