Police Inspector Amol Bhagat : पोळा गौरी-गणेश, दुर्गात्सव शांततेत साजरे करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करा – पोलीस निरीक्षक अमोल भगत -NNL
हिमायतनगर, अनिल मादसवार| शेतकऱ्यांचा पोळा हा सन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पोळा शांततेत साजरा करावा. तसेच आगामी गौरी गणेशोत्सव व तसेच दुर्गात्सव काळात नुसते देखावे साजरे न करता सामाजिक उपक्रम राबविण्यात यावे. उत्सवाच्या काळात देण्यात येणारे समाज प्रबोधन संदेश महत्वाचे ठरतात. हिमायतनगर शहराची हिंदू - मुस्लिम एकतेची परंपरा कायम ठेऊन आगामी काळात होणारे धार्मिक सन उत्सव सर्वानी एकोप्याने साजरे करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. असे अवाहन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी केले.
ते हिमायतनगर येथील परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयात गुरूवार दि. २८ दुपारी १२ वाजता तालुका दंडाधिकारी पल्लवी टेमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमेटीच्या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी पोलीस प्रशासनाकडुन अनेक महत्त्वपूर्ण सुचना देत असताना पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी धार्म...
