अर्धवट रस्त्यावरील उखडलेल्या गिट्टीवर स्लिप होऊन दुचाकीचा अपघात -NNL
हिमायतनगर। हिमायतनगर ते ढाणकीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे रस्त्यावर गिट्टी उघडी पडली आहे. तसेच पाऊस सुरू असल्यामुळे मुरूम आणि गिट्टीमुळे दुचाकी स्लिप होऊन सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पडल्याने दोघा जणाला गंभीर मार लागला आहे. असे अपघात नित्याचेच झाले असून, एखादा मेल्याशिवाय रस्त्याचे काम पूर्ण होणार नाही का..? असा संतप्त सवाल या भागातील शेतकरी संतोष गाजेवार यांनी व्यक्त करून तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करून द्या अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांना पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या आणि नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या विदर्भ मराठवाड्याला जोडणारा सिरपल्ली - डोल्हारी - पळसपूर - हिमायतनगर या प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याच काम दोन वर्षांपासून अत्यन्त स...
