Friday, July 3

Tag: Drama Shows Social Struggle”

Gandhi-Ambedkar : “गांधी-आंबेडकर नाटकाच्या माध्यमातून झाले सामाजिक संघर्षाचे दर्शन” -NNL

Gandhi-Ambedkar : “गांधी-आंबेडकर नाटकाच्या माध्यमातून झाले सामाजिक संघर्षाचे दर्शन” -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| ६३ व्या महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य महोत्सवांतर्गत गुरुवारी (ता.५) नांदेड केंद्रात सादर झालेल्या “गांधी आंबेडकर” या ऐतिहासिक नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. सुप्रसिद्ध नाट्यलेखक प्रेमानंद गज्वी यांच्या लेखणीतून साकारलेले हे नाटक राहुल जोंधळे यांनी दिग्दर्शित केले आहे. कुसुम प्रेक्षागृहात सादर झालेल्या या नाटकाला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. “गांधी आंबेडकर” हे नाटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या वैचारिक संघर्षावर आधारित आहे. नाटकात अस्पृश्यता, जातीयवाद, आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक-राजकीय घडामोडींचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. डॉ. आंबेडकरांच्या बालपणातील अन्याय-अत्याचार, अस्पृश्यतेचे चटके, आणि त्यांचे संघर्षमय आयुष्य याला दृश्य स्वरूप देण्यात आले आहे. महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यातील संवादांमधून धर्मातील वर्ण-जात व्यवस्थेव...
error: Content is protected !!