Friday, June 26

Tag: Dr. Praveen Patil

CA, Dr. Praveen Patil ; आई ही कायमची मैत्रीण असते – सीए, डॉ. प्रवीण पाटील

CA, Dr. Praveen Patil ; आई ही कायमची मैत्रीण असते – सीए, डॉ. प्रवीण पाटील

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l आई हीच आपली पहिली शिक्षिका असते. जीवनात येणाऱ्या अडचणी, सुख-दुःख आपण आपल्या आईलाच सांगतो. तीच आपल्याला जगण्याची ताकद देते. म्हणून आईचा सन्मान करणे ही प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे. आई आपली कायमची मैत्रीण असते; ज्याला आई नाही त्यालाच तिचे महत्व कळते. त्यामुळे आईचा सन्मान करा, तरच समाज तुमचा मान ठेवेल, असे प्रतिपादन नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सीए, डॉ. प्रवीण पाटील यांनी केले. शिक्षक दिनाच्या औचित्याने पीपल्स कॉलेजमध्ये मंगळवारी शिक्षक दिन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि इयत्ता अकरावी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत सोहळा नरहर कुरुंदकर सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी. प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर होते. यावेळी व्यासपीठावर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील, सचिव प्रा. श्यामल पत्की, शालेय समितीचे अध्यक्...
error: Content is protected !!