seeds, fertilizers, pesticides : शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके यांची कमतरता भासू देऊ नका : पालकमंत्री अतुल सावे
नांदेड| नांदेड जिल्ह्याला खरीप हंगाम 2025 साठी एकुण 7 लाख 76 हजार 762 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी बि-बियाणे, खते, किटकनाशके यांचा पुरवठा करण्यास कमतरता भासू देऊ नका, अशी सूचना राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केली. ख्ररीप हंगाम 2025 पुर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, आमदार भिमराव केराम, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार आनंदराव तिडके, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, ...
