Do not file baseless errors ; निराधाराणि त्रुटीच्या संचिका दाखल करू नये
श्रीक्षेत्र माहूर l माहूरच्या तहसील कार्यालयात तहसीलदार किशोर यादव यांच्या उपस्थितीत दिन 27 रोजी झालेल्या बैठकीत निराधारानी वेगवेगळ्या योजनात दाखल केलेल्या 288 अर्जा पैकी 193 अर्ज मंजूर करण्यात आले असून इतर संचिकात त्रुटी असल्याने निराधारानी पूर्ण कागदपत्र सहअर्ज दाखल करावें अन्यथा दलाला कडून लूट होण्याची संभावना असल्याने अर्ज अपूर्ण असल्यास थेंट मलाच भेटावे असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे
धडाकेबाज निर्णय घेऊन गोरगरिबांच्या कल्याणासाठी असलेल्या शासकीय योजनांची 100% अंमलबजावणी करण्यासाठी प्रसिद्ध असलेले तहसीलदार किशोर यादव यांनी दि 27 रोजी कार्यालयीन बैठक घेऊन निराधारानी वेगवेगळ्या योजना अंतर्गत तहसील कार्यालयात दाखल केलेल्या अर्जात संजय गांधी निराधार योजना 87 श्रावण बाळ योजना 191 इंदिरा गांधी निराधार वृद्धापकाळ योजना 10 असे एकूण 288 अर्ज प्राप्त झाले होते यापैकी छाननी आणि अ...
