District Collector strikes at disorder in first visit : जिल्हाधिकाऱ्यांचा पहिल्याच भेटीत गैरव्यवस्थेवर प्रहार; बारावीच्या परिक्षा केंद्राची घेतली झाडाझडती
नांदेड, अनिल मादसवार| जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी रुजू झाल्यानंतर पहिली कारवाई बारावीच्या परिक्षेदरम्यान हलगर्जीपणा दाखविणाऱ्या केंद्र प्रमुखावर,पर्यवेक्षकावर केली आहे. सोबतच परिक्षा केंद्रात अनधिकृतपणे उपस्थित असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तर कॉपी पुरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहे. नांदेड जिल्ह्यात कोणत्याही केंद्रावर, कुठेही कॉपी करणाऱ्यांची हयगय करू नये, (District Collector strikes at disorder in first visit) पोलिसांनी सक्त कारवाई करावी. शिक्षण विभागाने आवश्यक सुविधा पूर्ण कराव्यात अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज कंधार तालुक्यातील विविध परिक्षा केंद्राना भेटी दिल्या. या दरम्यान, परिक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा त्यांना आढळून आल्या नाहीत. या भेटी दरम्यान त्यांच्यासोबत शिक्षणाधिकारी माध्यमिक मा...
