District Collector ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा
नांदेड | राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबवण्यात येणाऱ्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व कार्यालयात आराखड्यानुसार सुरू असलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला व प्रत्येक विभागाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत दिलेल्या उद्दिष्टांनुसार कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मंजुषा कापसे, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव तसेच विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
या बैठकीत राज्य शासनाने प्रत्येक कार्यालयाला दिलेल्या 100 कृती आराखड्यानुसार दिलेल्य...
