Search & Rescue : शोध व बचाव कार्य, आपत्ती व्यवस्थापनासाठी उपयोगी पडणारे साहित्यांचे वितरण
नांदेड| आपत्ती प्रसंगी शोध व बचाव कार्य करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्याचे वितरण जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे 16 तहसिल कार्यालय, 8 उपविभागीय अधिकारी कार्यालय, मनपा, नप, होमगार्ड व क्युआरटी यांना नुकतेच वितरीत करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, जि.आ.व्य. सहायक गौरव तिवारी, आ.व्य. विभागाचे बारकुजी मोरे म.स. कोमल नागरगोजे, मनपाचे अग्नीशमन विभागाचे केरोजी दासरी, कांबळे, ना. तह. जेठे यांच्यासह सर्व संबंधीत अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य शासन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडुन प्राप्त झालेले शोध व बचाव कार्यासाठी आप...
