Bajrang Chowk King: वाढोणा शहरातील बजरंग चौकचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
हिमायतनगर, अनिल मादसवार| वाढोणा शहरातील "बजरंग चौकचा राजा" नवं प्रशांत गणेश मंडळाकडून मागील ६५ वर्षांपासून धार्मिक सलोखा जपत परंपरेने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सामाजिक व सांस्कृतिक वारसा जोपासत हा उत्सव दरवर्षी युवा मंडळींच्या पुढाकाराने पार पडतो.
यंदाही गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. सकाळ-सायंकाळी दररोज महाआरती, प्रसाद वितरण तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन होत असून लहान-थोरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उत्सव अधिकच मंगलमय झाला आहे.
मुंबईच्या धर्तीवर सजवलेली "गरुडावर आरूढ गणपती बाप्पाची भव्य व मनमोहक मूर्ती" भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. मनोकामना पूर्ण करणारा व नवसाला पावणारा गणपती म्हणून मंडळाने ख्याती मिळवली आहे. दरवर्षी प्रथम क्रमांक पटकाविण्याची परंपरा यंदाही कायम राहील असा विश्वास व्यक्त करून मं...
