District Collector : महाविहार बावरीनगरच्या विकास कामांना गती: जिल्हाधिकारी
नांदेड| भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा यांच्या अंतर्गत महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी १९८८ साली स्थापन केलेल्या महाविहार बावरीनगर येथे शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून वैज्ञानिक दृष्टिकोन, समता आणि बंधुभावाचा संदेश देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जात आहे. या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाकडून महाविहार बावरीनगरला तीर्थक्षेत्राचा (क) दर्जा प्राप्त झाला आहे.
या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून ध्यान केंद्र, बहुउद्देशीय सभागृह, भिक्खु व भिक्खूनी निवास, श्रामणेर-श्राविका निवास, भोजन कक्ष, अशोक स्तंभ, संरक्षण भिंत व अंतर्गत रस्ते अशा विविध कामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यापैकी बहुउद्देशीय सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून, जगातील सर्वात उंच अशोक स्तंभाचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रशासकीय इमारतीचे कामही वेगाने सुरू आहे.
या कामांचा ...
