Vanchit : वंचित बहुजन आघाडीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर — परस्पर गुन्हे दाखल; आरोपी अद्याप अटकेत नाहीत
हदगाव, गौतम वाठोरे | हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीतील अंतर्गत वाद उघडकीस आला असून, शुक्रवारी हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. हदगाव येथील वसंत लॉजमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित बैठकीदरम्यान दोन गटांत जोरदार वाद झाला. या घटनेनंतर दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले असून, अद्याप कोणत्याही आरोपीची अटक झालेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीत ‘बाहेरील हस्तक्षेप’ आणि दलालांच्या वाढत्या प्रभावामुळे असंतोष निर्माण झाला होता. निष्ठावंत कार्यकर्ते उपेक्षित राहत असून काही निवडक कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप होत होता. हा असंतोष अखेर शुक्रवारी उफाळून आला.
हदगाव येथील वसंत लॉजमध्ये आयोजित बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ नेते अविनाश भोसीकर व दिलीप आला राठोड उपस्थित होते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या हिमायतन...
