martyr jawan Kamesh Kadam | शहीद जवान कामेश कदम यांच्या पार्थिव देहावार अंत्यसंस्कार -NNL
नवीन नांदेड। हडको येथील रहिवासी असलेले बीएसएफ जवान तथा नाईक पदावर कार्यरत असलेले कामेश विठ्ठलराव कदम यांच्या पार्थिवदेहावार शासकीय ईतमांत सिडको येथील स्मशान भुमित ११ जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी शासनाच्या वतीने तहसीलदार संजय वारकड व जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, बीएसएफ जवान, पोलीस दल यांच्या वतीने सलामी देण्यात आली.
हडको येथील व बीएसएफ मधील जवान कामेश कदम हा गुडगाव हरियाणा येथे सेवेत कार्यरत असतांना ८ जुलै रोजी सायंकाळी ९ वाजता हृदयविकाराचा झटक्याने विरमरण आले,शहीद झाल्याचे वृत कळताच सिडको हडको परिसरात शोककळा पसरली.
कामेश कदम यांच्ये पार्थिवदेह हरियाणा मार्ग हैदराबाद येथे विमानाने रात्री उशिरा ११ रोजी आले,या नंतर बीएसएफ च्या वाहनाने हैदराबाद मार्ग सकाळी आठ वाजता चंदासिंग कॉनर , एम.आय.डी.सी.चौक नांदेड येथे वाहनाने पार्थिव देह येताच नगरसे...
