Abhijit Raut ; लोकाभिमुख प्रशासन निर्माण करणे ही अधिकार्यांची जबाबदारी : अभिजीत राऊत
नांदेड l शासकीय सेवेमध्ये आपण येतो ती लोकांची सेवा करण्यासाठी. लोकांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे. हा विश्वास कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा असतो. खरे तर लोकाभिमुख प्रशासन निर्माण करणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी असते, असे प्रतिपादन वस्तू व सेवा कर सह आयुक्त अभिजीत राऊत यांनी आज येथे केले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भावनमध्ये आज नवनियुक्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा स्वागत समारंभ व मावळते जिल्हाधिकारी तथा संभाजीनगर येथील वस्तू व सेवा कर सह आयुक्त अभिजीत राऊत यांचा निरोप समारंभ महसूल व अन्य कर्मचाऱ्यांमार्फत आयोजित करण्यात आला होता.
यावेळी त्यांनी लोकाभिमुख प्रशासन ही आपल्या प्रशासकीय सेवेची ओळख बनवा, असे आवाहन यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना केले.
नांदेड जिल्ह्यातील आपले वास्तव्य आठवणीत राहणारे असून या काळात जलसंधारणापासून लेंडी प्रकल्प...
