CPI’s agitation for caste-wise census | जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी भाकपचे आंदोलन – NNL
नांदेड| 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवा व जातनिहाय जनगणना करा या मागणीसाठी गुरुवार दि.18 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. व आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यां मार्फत महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवले आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाकप व अन्य जनसंघटनांनी जातनिहाय जनगणना करण्याची व आरक्षणाची 50 टक्के मर्यादा हटविण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून केलेली आहे. मागील काही वर्षात समाजासमाजात विषमतेची दरी मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसत आहे. केंद्र व राज्य सरकार मागासवर्गीयांच्या कल्याणा-साठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेष तरतूद करीत असते. मात्र मागास जातीची नेमकी संख्या किती आहे हेच माहिती नसेल तर त्यावर अंदाजित आर्थिक तरतूद करणे चुकीचे आहे.
यासाठी जातनिहाय जनगणना तातडीने होणे आवश्यक आहे. मागील सन 193...
