Abhijat ; मराठीच्या ‘अभिजात’साठी अभिनंदनाचा ठराव सप्तरंगी साहित्य मंडळाची विशेष बैठक संपन्न – NNL
नांदेड | येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल भारत सरकारच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. या निमित्ताने मंडळाच्या उपकार्यालयात एक विशेष बैठक घेऊन या बैठकीत सदरील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी मोहनराव कुंटुरकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शरदचंद्र हयातनगरकर, गजानन हिंगमिरे तसेच सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, कोषाध्यक्ष शंकर गच्चे, कार्याध्यक्ष साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर यांची उपस्थिती होती.
शहरातील मालेगाव रोड स्थित पवननगर येथील मंडळाच्या उपकार्यालयात सदरील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून सप्तरंगी साहित्य मंडळाची मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी होती. या संब...
