‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठात कम्प्युटर-एडेड ड्रग डिझायनिंग कार्यशाळेचा यशस्वी समारोप – NNL
नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलामध्ये दि. २१ ते २६ ऑक्टोबर, दरम्यान पीएम-उषा योजनेअंतर्गत ‘कंप्युटर-एडेड ड्रग डिझायनिंग’ या विषयावर एक आठवडाभर चालणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस राज्यभरातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पदव्युत्तर, संशोधक विद्यार्थी विशेषतः छत्रपती संभाजीनगर, कराड, अमरावती, लातूर आणि नांदेड येथील संशोधक, विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संखेने सहभागी झाले होते.
ख्यातनाम संशोधक बंगलोर, मुंबई, नागपूर, नगर आणि शिरपूर येथून मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. त्यांनी सहभागींना संगणक-विषयी औषध संशोधनातील नवीनतम तंत्रज्ञान आणि साधनांबद्दल मार्गदर्शन केले. समन्वयक डॉ. संतोष बुटले यांनी कार्यशाळेची उद्दिष्टे स्पष्ट केली आणि औषध शोधण्याच्या प्रक्रियेत संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रशिक्षण यांच्या महत्त्वावर भ...
