Collector gives green flag : मतदार जनजागृतीसाठी एलईडी व्हॅनला जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते हिरवी झेंडी
नांदेड| मागच्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी कमी मतदान झाले आहे, त्याठिकाणी एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येईल. यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. आजपासून केंद्रीय संचार ब्युरो यांच्यामार्फत नांदेड विधानसभा मतदार संघातील गावामध्ये एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येणार आहे. आज या एलईडी व्हॅनला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी परिसरात हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, केंद्रीय संचार ब्युरोचे सुमीत डोडल आदींची उपस्थिती होती. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. सर्व मतदार संघातील मतद...
