शहरातील पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात येतील – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे सीटूच्या शिष्टमंडळास आश्वासन -NNL
नांदेड। ३१ ऑगस्टच्या रात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड शहरातील सखल भागातील राहणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीतील पूरग्रस्तांना नुकसान भरपाई पोटी सानुग्रह अनुदान देण्यात यावे आणि ५० किलो ग्रॅमची रेशन किट देण्यात यावी अशी मागणी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) संलग्न मजदूर युनियनच्या वतीने करण्यात आली होती. तेव्हा मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्ताना प्रत्येकी दहा हजार रुपये मंजूर केले होते. शहरातील पूरग्रस्तांना नऊ कोटी रुपये मंजूर झाले होते.
जुलै २०२३ च्या धरतीवर यावर्षी रुपये २० हजार आणि रेशन किटची मागणी सीटूच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निवेदन देण्यासाठी थांबलेल्या बैठक कक्षातील सीटूच्या कार्यकर्त्यांना स्वतः थांबून निवेदन स्वीकारले आणि मागच्या वर्षीसारखे यावर्षी होणार नाही, ...
