Citizens should be careful : नागरिकांनी काळजी घ्यावी, कामाशिवाय घराबाहेर पडू नये – आ. प्रतापराव पाटील चिखलीकार
लोहा| जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शनिवारी भल्या पहाटे पासून लोहा कंधार तालुक्यासह जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सकाळीच अनेक गावात पुर परिस्थिती उदभवली काही गावांचे संपर्क तुटले. शिवाय शनिवारी दुपारी पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. प्रशासन खबरदारी घेत आहे मी व अधिकारी अनेक ठिकाणी गेलो तेथील उदभवलेल्या पूर परिस्थितीची पाहणी केली. लोकांच्या अडीअडचणी सोडविल्या काही ठिकाणी लोकांचे स्थलांतर केले. अजून पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अश्या परिस्थितीत लोहा - कंधार सह जिल्ह्यातील नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये आम्ही सोबत आहोत. काहीही समस्या असेल तर कळवावे असे आवाहन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
शनिवारी ( ता.२७ सप्टेंबर) सकाळपासून आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा कंधार तालुक्यातील ज्या गावात पूर परिस्थिती निर्माण झा...
