Dr. Manohar Chaskar ; सिनेमा आपल्या ध्येयाचे प्रतिबिंब असावा-कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL
नांदेड| सिनेमा ही कला आहे आणि तंत्र देखील आहे. सिनेमा तयार करण्यासाठी जीवनाकडे डोळे उघडे ठेवून पहा. ध्येयनिश्चिती शिवाय आपली अभिव्यक्ती दमदार होऊ शकत नाही. तुम्ही असा सिनेमा निर्माण करा त्यात आपल्या ध्येयाचे प्रतिबिंब असेल. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले.
राष्ट्रीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था,पुणे (एफटीआयआय) आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बेसिक कोर्स इन स्मार्टफोन फिल्म मेकिंग’ या कोर्सचे कुलगुरूंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एफटीआयआय चे कोर्स संचालक रितेश ताकसांडे, माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. दीपक शिंदे, डॉ...
