सिडको स्मशान भुमि दुरावस्था, माजी उपमहापौर विनय पाटील यांनी राबविली स्वच्छता मोहीम -NNL
नवीन नांदेड। मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या सिडको स्मशानभुमि मध्ये झालेल्या दुरावस्था प्रकरणी अखेर माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांनी तात्काळ जेसीबी साह्याने व स्वच्छता कर्मचारी यांच्या मार्फत परिसरातील स्वच्छता व चिखलाचे झालेले मैदान गिटी यांच्या सहायाने परिसर कायापालट केला जवळपास साह तास चाललेल्या अभियान मुळे परिसर स्वच्छ व सुंदर झाला, या उपक्रमाचे अनेकांनी अभिनंदन केले.
सिडको परिसरात असलेल्या एकमेव असलेल्या या स्मशान भुमि मध्ये अंत्यसंस्कार करावयास आल्यानंतर अनेक अडचणी मयताच्या नातेवाईक यांना तोंड द्यावे लागत होते, तर परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल, घाणीचे साम्राज्य, दुरंगधी,यामुळे मोठया प्रमाणात अडचणी जाणवत होत्या.
अखेर १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, पत्रकार व बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी व साफ सफाई कर्मचारी ...
