Meenal Karanwa | ‘सिईओ’ ताई ‘लाडक्या बहिणीं ‘च्या मदतीला पोहचाताहेत शेतशिवारात -NNL
नांदेड| एखाद्या योजनेसाठी लोकांशी थेट जनसंपर्क ठेवणे, रोज येणाऱ्या अडचणीवर मात करणे, त्यातून अधिक सुलभ अधिक सहज सोपी योजना व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचा प्रयोग नांदेड जिल्ह्यात होत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सिईओ) मीनल करणवाल या मुख्यमंत्री माझी बहिण योजनेसाठी दररोज थेट लाभार्थी भगिनींशी जिल्हाभर संपर्क साधत आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जिल्ह्यामध्ये पात्र ठरणाऱ्या सर्व महिलांना या योजनेची माहिती व्हावी यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची यासंदर्भात दररोज महिला व बालविकास विभाग व अन्य सर्व संबंधित विभागासोबत सकाळी साडेदहाला बैठक होते. आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचा जिल्हाभर प्रवास सुरू होतो. कधी थेट शिवारात तर शे...
