Candidates keep an account ; उमेदवारांनो ! खर्चाचा हिशोब ठेवा, आयोगाची करडी नजर; बैठक 4 नोव्हेंबरला ; प्रथम तपासणी 7 नोव्हेंबरला -NNL
नांदेड। भारत निवडणूक आयोगाने लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सहभागी असणाऱ्या उमेदवारांनी आपल्या खर्चाच्या हिशोबाबाबत दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भातील पहिली बैठक ही दिनांक 4 नोव्हेंबर रोजी डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे पहिल्या माळयावर सायंकाळी ४ वाजता होणार आहे.
आचाससंहितेप्रमाणेच निवडणुकीच्या खर्चाचा ताळमेळ व त्या बैठकांना आवर्जून उपस्थित राहणे अनिवार्य आहे. याकडे गंभीरतेने बघावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व निवडणूक खर्चाच्या तपासणीबाबत दक्ष राहणे यासंदर्भात आयोगाचे सक्त निर्देश आहेत. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम ७७ नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत: किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुक...
