Wednesday, May 13

Tag: can make superpower India

विद्यार्थीच महासत्ताक भारत घडवू शकतात- आ.ग. ढवळे -NNL

विद्यार्थीच महासत्ताक भारत घडवू शकतात- आ.ग. ढवळे -NNL

करियर, नांदेड
अर्धापूर| भारत देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त विषमता, जातीयता, भ्रष्टाचार नष्ट करुन विज्ञानाची कास धरुन तंत्रज्ञानाने देश बलवान घडविण्याचे काम विद्यार्थीच करु शकतात असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गीतकार, नाटककार आ.ग. ढवळे यांनी केले. ते नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील लोणी बु. येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये स्वलिखीत शाहिरी गीत गायनातून व एकपात्री नाट्यप्रयोग सादर करुन विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. मुख्याध्यापक एस.आर. डमरे यांनी आ.ग. ढवळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार केला. गुरु गौरव आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नालंदा पाटील- भगत यांनी सुत्रसंचालन केले. अर्धापूरकर मॅडम यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिंदे, डहाळे आदींनी परिश्रम घेतले....
error: Content is protected !!