Travel Carnival on Independence Day : स्वातंत्र्यदिनानिमित्त पेटीएम ट्रॅव्हल कार्निवलची घोषणा; फ्लाइट, ट्रेन, बस बुकिंगवर २५% पर्यंत सवलती -NNL
मुंबई| भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा वितरण कंपनी आणि क्यूआर आणि मोबाइल पेमेंट्सची अग्रणी पेटीएमने २० ऑगस्ट पर्यंत चालणा-या 'पेटीएम ट्रॅव्हल कार्निवल'ची घोषणा केली आहे. स्वातंत्र्य दिन साजरा करताना या कार्निव्हलमध्ये ग्राहकांना फ्लाइट, बस आणि ट्रेन तिकिटांच्या बुकिंगवर १२-२५% ची अप्रतिम सवलत मिळेल.
पेटीएम ट्रॅव्हलचे प्रवक्ते म्हणाले, "आम्ही २० ऑगस्टपर्यंत आमच्या स्वातंत्र्यदिन ट्रॅव्हल कार्निव्हल सेलद्वारे प्रवास सोयीस्कर आणि परवडणारा बनवत आहोत. आरबीएल, आयसीआयसीआय, बँक ऑफ बडोदा, डीबीएस आणि एचएसबीसीसारख्या आघाडीच्या बँकांसोबत भागीदारी करून आम्ही विशेष ऑफर देत आहोत. फ्लाइट, बस आणि ट्रेन तिकिट बुकिंगवर बचत वाढवणाऱ्या सवलती, युपीआय वापरून पैसे दिल्यावर शून्य पेमेंट गेटवे शुल्क आणि ग्राहकांना उत्तम मूल्य प्रदान करणाऱ्या फ्लाइट्स आणि बसेसवर भरीव सवलत यासारख्या सेवा देखील देतात.
पे...
