national school baseball tournament ; राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेत मुले व मुलींच्या संघास सुवर्ण पदक प्राप्त
नांदेड। आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय बेसबॉल (19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन 14 ते 18 जानेवारी 2025 या कालावधीत पिपल्स कॉलेज नांदेड व सायन्स कॉलेज नांदेड येथे संपन्न झाले.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मा. श्री. महेश वडदकर, निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन मा.श्री.जयकुमार टेंभरे (जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड) मा. श्री. राजेंद्र इखनकर (सचिव, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन), मा.श्री.संजय कुमार (सदस्य, एस.जी.एफ.आय.), श्री.ज्ञानेश काळे (सातारा) ,श्री. आनंदा कांबळे (नांदेड), तांत्रीक समिती सदस्य श्री. इंद्र...
