Saturday, June 27

Tag: Bhumanna Narod’s determination to hold elections without money; Discussions in Biloli

Biloli ; पैशाविना निवडणुकीचा भूमन्ना नरोड यांचा निर्धार; बिलोलीत चर्चा रंगल्या

Biloli ; पैशाविना निवडणुकीचा भूमन्ना नरोड यांचा निर्धार; बिलोलीत चर्चा रंगल्या

नांदेड, राजकीय
बिलोली l बिलोली नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि पदवीधर भूमन्ना पिराजी नरोड यांनी “पैसा खर्च करणार नाही आणि पैसा मिळवण्यासाठी निवडणूक लढवणार नाही” असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या या भूमिकेने स्थानिक राजकारणात चर्चेची नवी लाट उसळली आहे. नरोड यांच्या या घोषणेला पाठिंबा देणाऱ्यांचे म्हणणे आहे की, निवडणूक ही मूल्यांवर आधारित असावी. पैसा आणि प्रलोभनांवर आधारलेले राजकारण समाजाचे नुकसान करते. तर दुसरीकडे काहींनी हा निर्धार वास्तवापासून दूर असल्याचे म्हणत, “आजच्या काळात पैशाविना निवडणूक लढवणे म्हणजे डिपॉझिट जप्त होण्याचा धोका” असे मत व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे भूमन्ना नरोड हे आर्थिक दृष्ट्या सुसंपन्न असून, समाजात प्रतिष्ठित मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या निर्णयामागे आर्थिक मजबुरी नसून विचारांची ताकद आहे, असे समर्थक म्हणतात. हल्लीच्या काळात ...
error: Content is protected !!