Bhima Mahotsav : नांदेडमध्ये ७ नोव्हेंबर रोजी साजरा होणार भीम महोत्सव -NNL
नांदेड| डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन येत्या ७ नोव्हेंबर रोजी भीम महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नुकतीच एक बैठक पार पडली. भीम महोत्सवाच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळ वाढीस लागावी, असा सूर उपस्थित मान्यवरांनी काढला. नांदेडमध्ये आयोजित भीम महोत्सवाच्या पूर्वतयारीसंदर्भात विसावा पॅलेस येथे शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते दिगंबरराव मोरे यांची उपस्थिती होती.
या बैठकीला सेवानिवृत्त अभियंता अशोक गायकवाड, इंजि. भारत कानिंदे, सेवानिवृत्त कर्मचारी सम्राट हटकर, अशोक कांबळे, गणपत गायकवाड, ऍड. मंगेश वाघमारे, शेषराव वाघमारे, राज गोडबोले यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी भीम महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक म्हणून मुरलीधर हंबर्डे, नितीन एंगडे, अश्विन सरोदे, संकेत जमदाडे, विश्वजित शुरकांबळे, राहुल खंडेलो...
