Annual Brahmotsava : भगवान बालाजी मंदिर सिडकोचा ३४ वा वार्षिक ब्रह्मोत्सवा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन -NNL
नवीन नांदेड| सिडको येथील श्री भगवान बालाजी मंदिराच्या ३४ वा दसरा ब्रह्मोत्सवानिमित्त ३ ते १२ ऑक्टोंबर दरम्यान दैनंदिन होम हवन विधी ,अभिषेक,कलशाभिषेक, वसंत व कल्याण उत्सव आदी कार्यक्रमासह रथयात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून जय्यत तयारी करण्यात येत असून रंगरंगोटी सह मंदिरावर व कमान प्रवेशद्वार येथे रोषणाई करण्यात येत आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री भगवान बालाजीचा ब्रह्मोत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला असून ३ ते १२ऑक्टोंबर दरम्यान आचार्य पंडित श्री पंचरात्रगम विद्वावान सुवर्ण कंकनालकृत श्रृंगारम रंगानाथाचार्य यज्ञाचार्य,जिवागुडा व मंदिर पुजारी श्री.दिव्यांशु महाराज यांच्या आचार्यतत्वाने सकाळी अभिषेक, नामपाठ, होम हवन विधीपूर्वक संपन्न होणार आहे. दररोज वाहनातून श्री भगवान बालाजी उत्सव मूर्तीची मिरवणूक सकाळी व सायंकाळी निघणार आहे.
सोमवारी दि ३ऑक्टोंबर रोजी सुप्रभात,अभिष...
