Beneficiary farmers of Chandrapur district ; चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना ३१ ऑगस्ट पर्यंत मिळणार संपूर्ण पिक विमा रक्कम – NNL
चंद्रपूर| पाऊस आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे आणखी मोठा दिलासा मिळाला आहे; राज्याचे कृषिमंत्री ना. श्री. धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उर्वरित पीक विम्याची रक्कम कोणतेही कारण न सांगता ३१ ऑगस्ट २०२४ पूर्वी देण्याचे तसेच विहित मुदतीत अपात्र ठरविलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पात्र ठरविण्याचे कडक निर्देश विमा कंपनीला दिले. या सोबतच पिक विमा सर्वेक्षणा संदर्भातील त्रुटी आणि अडचणी बाबतही सखोल चर्चा करून कंपनीने शेतकऱ्यांना योग्य सहकार्य करण्याचे आदेशही कृषिमंत्र्यांनी दिले.
पिक विमा रकमेच्या संदर्भात तसेच पिक विमा कंपनीसंदर्भातील विविध तक्रारींसंदर्भात पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या दालनात आज विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कृषी...
