Transport Minister Pratap Sarnaik : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान लोकचळवळ व्हावी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई| राज्यातील सर्व एस टी बस स्थानकांमध्ये राबविण्यात येणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानामध्ये एस.टी. कर्मचाऱ्यांसोबतच लोकांनीही सहभागी व्हावे आणि ती एक लोकचळवळ व्हावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. कुर्ला बसस्थानक येथे या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याहस्ते कुर्ला नेहरूनगर बसस्थानकावर " हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाच्या बोधचिन्हाचे अनावरण करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
मंत्री सरनाईक म्हणाले की, आपण आपल्या घरात ज्या पद्धतीने स्वच्छता ठेवतो त्याप्रमाणेच आपण जिथे काम करतो, तेथे देखील आपले घर समजून त्या कार्यालयाची, त्या बसस्थानकाची स्वच्छता ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. भविष्यात स्वच्छ ,सुंदर , सुशोभि...
